Bandhkam Kamgar Shaikshanik Yojana | बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना शैक्षणिक योजना, फॉर्म, पात्रता वाचा !

Bandhkam Kamgar Shaikshanik Yojana : नमस्कार सर्वांना, महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत तुम्हाला माहीतच आहे

बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत असतो. त्या अंतर्गत जे शैक्षणिक योजनेचा लाभ या योजनेअंतर्गत दिला जातो. शालेय शिक्षणापासून ते इंजीनियरिंग पर्यंत बांधकाम कामगारांच्या

मुलांसाठी ही योजना राबवली जाते. या योजनेमधून तुम्हाला 1 लाख रुपये पर्यंत लाभ दिला जातो. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना शैक्षणिक योजना लाभ मिळण्यासाठी अर्ज कसा करावा ?

याची सविस्तर माहिती तुम्हाला खालील प्रमाणे देण्यात आलेले आहेत. बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजना कोणती आहेत ? बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी किंवा त्यांच्या शैक्षणिक योजनेचा लाभ देण्यासाठी योजना कोणती आहे बघूया.

Bandhkam Kamgar Shaikshanik Yojana

– दोन पाल्यांना पहिली ते सातवीसाठी प्रति वर्ष 2500 रुपये किंवा त्याहून आठवी ते दहावीसाठी प्रति वर्षे पाच हजार रुपये योजनेचा लाभ घेण्यासाठी शाळेत 75% हजेरी लावणे आवश्यक असते.

– दोन पाल्यांना दहावी ते बारावी मध्ये 50% की त्यापेक्षा अधिक गुण मिळाल्यास दहा हजार रुपये आणि 50% गुण मिळाले याची गुणपत्रिका योजनेचे लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.

– दोन पाल्यांना ही अकरावी ते बारावीच्या शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष दहा हजार रुपये योजनेचा लाभ घेण्यासाठी दहावी आणि अकरावीचे गुणपत्रिका आवश्यक आहे.

– दोन पाल्यांना एमएससीआयटी कोर्ससाठी मदत परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र जमा केल्या शुल्कची रक्कम माघारी मिळते.

– दोन पाल्यांना किंवा पुरुष कामगारांच्या पत्नीस पदवीच्या प्रथम किंवा द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामग्री साठी प्रति वर्ष 20000 रुपये मिळतात.

– दोन पाल्य अथवा कामगारांच्या पत्नीस वैद्यकीय पदवी शैक्षणिक करता एक लाख रुपये व अभियांत्रिक पदवी अभ्यासाकरिता 60 हजार रुपये इतके मिळतात.

– दोन पाल्यांना शासनमान्य पदवीकरिता 20000 रुपये प्रति वर्ष आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी तुम्हाला 25 हजार रुपये इतकी रक्कम मिळू शकते.

📢 शैक्षणिक योजना फॉर्म येथे पहा

Bandhkam Kamgar Shaikshanik Yojana

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना शैक्षणिक योजना

महत्त्वाचं म्हणजे योजनेमधील पाच, सहा, आणि सात ह्या क्रमांकासाठी शैक्षणिक मध्ये उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र गुणपत्रक तसेच चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेश घेतल्या बाबतचा बोनाफाईड दाखला असे

आवश्यक कागदपत्रे तुम्हाला त्यासोबत जोडावे लागतात अशी ही योजना आहे. एकूण सात बाबींसाठी बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी किंवा पत्नीसाठी ही योजना आहेत.

या बांधकाम कामगार कल्याण विभागाकडून राबवल्या जात असतात. याचा फॉर्म कसा भरायचा आहे अर्ज नमुना पीडीएफ तुम्हाला खाली देण्यात आला आहे.

हे पण वाचा :- NLM कुक्कुटपालन अनुदान योजना 2024 पात्रता, कागदपत्रे 25 लाखांचे अनुदान वाचा !

बांधकाम कामगार कल्याणकारी शैक्षणिक कर्ज योजना कागदपत्रे कोणती लागतात ?

  • वडिलांचे पतीचे बांधकाम कामगार असल्याचे ओळखपत्र
  • बँक पासबुक
  • रहिवासी पुराव्यामध्ये आधार कार्ड, शिधापत्रिका, सुरू असलेले विज बिल, वाहन परवाना, किंवा ग्रामपंचायत दाखला
  • शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा

योजनेचा फायदा फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीलाच मिळतो हे लक्षात घेण्यासारखा आहे.

Mahabocw Shaikshanik Yojana Form

या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज कसा करायचा ? महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो.

ऑनलाईन अर्ज सादर करताना वरील सर्व कागदपत्रे स्कॅन स्वरूपात अपलोड तुम्हाला करावे लागतात. अर्ज मंजूर झाल्यास पैसे हे तुम्हाला बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा केले जातात, अशी ही योजना आहे.

ज्याचा तुम्ही लाभ घेऊन नक्की या योजनेचा फायदा मिळवून तुमचं भविष्य हे तुम्ही उज्वल करू शकता, आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट साठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *