Kukut Palan Yojana Mahiti | NLM कुक्कुटपालन अनुदान योजना 2024 पात्रता, कागदपत्रे 25 लाखांचे अनुदान वाचा !

Kukut Palan Yojana Mahiti : शेतकरी बांधवांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध योजना केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या देशभरात सुरू आहेत. अनेकदा शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन,

शेळीपालन किंवा पशुपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांना करायचा असतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडे हवं तेवढं भांडवल नसतं, भांडवल असलं तरी तितकी गुंतवणूक कशी करावी हे अनेक जणांना अडचणी येत असतात.

अशावेळी शासन यांना प्रोत्साहित करण्यासाठी योजना राबवत असते. आता या योजना विविध स्तरावरून राबवल्या जातात, जसे केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद, आणि इतर बँका असतील यांच्याकडून राबवल्या जातात.

अशावेळी केंद्र शासनाची नवीन योजना सुरू झालेली आहे. यामध्ये तुम्ही कुकूटपालनाचा जो काही व्यवसाय आहे, हा मोठ्या प्रमाणात उभा करू शकता.

योजना घटकयोजनाची माहिती
योजना नावराष्ट्रीय पशुधन मिशन
उद्देश्यपशुपालन क्षेत्राचा विकास आणि रोजगार निर्मिती
अनुदान रक्कम25 लाख रुपये पर्यंत
लाभार्थीशेतकरी, उद्योजक, स्वयंसेवी संस्था
अधिकृत वेबसाईटhttps://nlm.udyamimitra.in/

Kukut Palan Yojana Mahiti

50 लाख रुपयांचा हा प्रोजेक्ट आहे, त्यात 25 लाख रुपये तुम्हाला अनुदान शासनाकडून दिला जातो. अशावेळी आता या योजनेचा अर्ज कसा करावा लागतो ? अनुदान कसं मिळतं ? योजनेचे नाव काय ?

कागदपत्रे कोणते लागतात ? ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो याची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहेत. याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहूयात.

सदर योजनेचे नाव राष्ट्रीय पशुधन मिशन योजना या योजनेच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेत अंतर्गत 25 लाख रुपये पर्यंत अनुदान तुम्हाला मिळतं.

📢 हे पण वाचा :- आता 10 गाई म्हशींसाठी मिळतंय 7 लाखापर्यंत कर्ज पण कसे कोणाला अन् किती पहा ?

कुक्कुटपालन अनुदान योजना काय ?

कुक्कुटपालनासाठी अनुदान कसे घ्यायचे आहे ? याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. अंडे व कोंबडी देशभरातील लोकसंख्या ही अवलंबून आहे. आता डेअरी फार्म प्रमाणेच पोल्ट्री फार्म ही गावोगावी सुरू होत आहे.

या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात उद्योजक तिकडे वळत आहे. आता ग्रामीण भागात घराच्या मागच्या अंगणातून कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणात केले जातात. कोंबड्यांच्या अनेक प्रगत जातीचे संगोपन करून शेतकरी बांधव

त्यातून चांगलं उत्पादन किंवा कमाई करत आहेत. युवक ही त्यात सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन त्या ठिकाणी वाढत आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजना या योजनेअंतर्गत 50 टक्के किंवा 25 लाख रुपये

अनुदान हे आहे. आता या योजनेचा लाभ घेत तुम्ही पोल्ट्री युनिट सुरू करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला nlm udyam mitra या अधिकृत संकेतस्थळावरती अधिक माहिती मिळतात मिळवता येते.

Kukut Palan Yojana Mahiti

NLM कुक्कुटपालन अनुदान योजना

या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला खाली लिंक सुद्धा देण्यात आलेली आहेत, कुक्कुटपालन करण्यासाठी तुम्हाला योग्य जात निवडणे देखील गरजेचे आहे. जसे की मास आणि अंडे यासाठी देशभरात मोठी मागणी आहे.

त्यामुळे तुम्हाला योग्य कोंबडीची जात निवडावी लागते किंवा रोगप्रतिकारशक्ती देखील जास्त प्रमाणात असलेल्या जातींची निवड करणे फार गरजेचं आहे. तज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार कडकनाथ,

ग्रामप्रिया, सील, स्वरनाथ, केरी शामा, निर्भिक, श्रीनिधी, वनराज, कारी उज्वल, आणि कार्य आधी इत्यादी कोंबड्या आणि त्यांच्या अंडी बाजारात विकली जातात. आणि यातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा देखील मिळतो.

📢 हे पण वाचा :- नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 2024 ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ? पात्रता, कागदपत्रे संपूर्ण माहिती मराठीत !

राष्ट्रीय पशुधन मिशन योजना

या अंतर्गत पोल्ट्री फार्म अनुदान मिळविण्यासाठी तुम्हाला अधिकृत एनएलएम उद्योग मित्रा डॉट इन या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

यासाठी तुम्हाला प्रकल्प आराखडा हा लागत असतो, तुम्ही जवळील CA किंवा आराखडा तयार करून देणाऱ्याशी संपर्क करून इतर कागदपत्रे जमा करून या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

Kukut Palan Yojana Mahiti

तुम्हाला अधिक माहिती हवी असल्या जवळच्या जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागात कार्यालयात जाऊन कुक्कुटपालन, कोंबड्यांच्या सुधारित जाती किंवा कुक्कुटपालनासाठी

लागणारा एकूण खर्च पोल्ट्री फार्मची उभारणी याबाबत माहिती मिळवू शकता. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, जी तुमच्या कामात पडेल.

योजनेसंदर्भातील अधिक माहितीचा व्हिडिओ व ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल धन्यवाद….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *