Lek Ladki Yojana Mahiti Marathi | लेक लाडकी योजना सुरू मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रु. पण अर्ज कुठे कराल ?

Lek Ladki Yojana Mahiti Marathi : नमस्कार सर्वाना, शासनाकडून मुलीं करिता व महिलांसाठी बऱ्याच नवनवीन योजना राबवल्या जातात. अनेक वर्षापासून महिला सक्षमीकरणा करिता सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.

लेक लाडकी योजना ही सरकार राबवत आहे. या सरकारी योजनेअंतर्गत मुलींना 1 लाख रुपये आर्थिक मदत केली जाते. सरकारचा याबद्दलचा निर्णय दिनांक 30 ऑक्टोबर 2023 या दिवशी सरकारच्या

बालकल्याण आणि महिला विभाग यांच्याकडून हे निर्गमित केला गेला आहेत. आज आपण या सरकारी लेक लाडकी योजनेची सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Lek Ladki Yojana Mahiti Marathi

या योजनेचा लाभ कोणाला मिळेल कसा मिळेल : पहा मित्रांनो ही योजना आहे या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपले जे राशन कार्ड आहे ते केशरी व पिवळे राहणे गरजेचे आहे या राशन कार्ड धारकांच्या कुटुंबातील मुलींना या चा लाभ मिळणार आहे.

सरकारने सुरु केलेल्या योजनेच्या माहितीनुसार ही योजना आहे या योजनेचा लाभ जुळ्या मुली किंवा 1 मुलगा आणि दुसरा मुलगी अथवा एक किंवा दोन मुली असणाऱ्या योजनेच्या लाभा करिता पात्र आहेत.

त्याचबरोबर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्याकरिता त्या कुटुंबाची जी उत्पन्न असते ते एक लाखांपेक्षा कमी राहावे लागते त्या कुटुंबातील मुलींनाच त्याचा लाभ घेता येईल.

📢 हे पण वाचा :- आता घरबसल्या मोबाईलवर चेक करा तुमच्या आधार कार्ड कोणते बँक खाते लिंक आहेत ? वाचा प्रोसेस पटकन !

लेक लाडकी योजना संपूर्ण माहिती मराठी

लाभ मिळाल्यास कसे मिळेल पैसे ? : योजनेत मिळणारी आर्थिक मदत ही त्या पात्र असलेल्या मुलींना वेगवेगळ्या टप्प्यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. या माध्यमातून मुलीचा जन्म झाल्यानंतर त्यावेळेस पाच हजार रुपये मिळतात.

मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये देतात मग पुन्हा मुलगी सहावीत गेल्या वर सात हजार रुपये दिले जातात नंतर मुलगी अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये दिले जातात.

पुन्हा मुलीचे अठरा वर्ष झाले की मंग 75 हजार रुपये मिळतात म्हणजे या योजनेच्या माध्यमातून मुलीं करिता अठरा वर्ष वय होईपर्यंत तिला एकूण एक लाख रुपये मिळून जातील.

लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे

केशरी किंवा पिवळे राशन कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, फोटो, आई व वडीलासोबत मुलीचा फोटो, मोबाईल नंबर, मुलीच्या वडिलांचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, बँक चे पासबुक ईमेल आयडी या सोबत इत्यादी कागदपत्रे द्यावी लागतात.

📢 हे पण वाचा :- आता घरबसल्या मोबाईलवर चेक करा तुमच्या बँकेला कोणता नंबर लिंक ? वाचा प्रोसेस पटकन !

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करावा लागतो

संबधित योजनेच लाभ किंवा अर्ज करण्याकरिता अर्ज हा तुम्हाला तुमच्या तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना या कार्यालयामध्ये अर्ज करायचे आहेत.

किंवा गावातील अंगणवाडीमध्ये जाऊन याकरिता अर्ज करू शकता. किंवा या योजनेची सविस्तर माहिती व शासन निर्णय डाउनलोड व व्हिडीओ पाहण्यासाठी खालील YouTube व्हिडीओ पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *