Vihir Yojana Online Form | नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 2024 ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ? पात्रता, कागदपत्रे संपूर्ण माहिती मराठीत !

Vihir Yojana Online Form : नमस्कार सर्वांना, देशातील तमाम शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ राज्य शासन, केंद्र शासन यांच्याकडून वेळोवेळी दिला जातो.

अनेक शेतकरी बांधव शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन शेतीत अनेक क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे. या योजनेचा लाभ घेत शेतकरी देखील समृद्धीकडे वळत चालला आहे.

अशा स्थितीमध्ये अजूनही देशातील अनेक शेतकरी असे आहेत, ज्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही अशावेळी शेतकऱ्यांना ही योजनेची माहिती व्हावी यासाठी आज आपण हा आर्टिकल घेऊन येत आहोत.

या आर्टिकलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहिरीसाठी चार लाखांपर्यंत अनुदान दिलं जातं. विविध प्रवर्गांसाठी हे अनुदान वेगवेगळे असे आहे.

योजनाचे वैशिष्ट्ययोजनाचे नाव
योजनेचे नावमनरेगा सिंचन विहीर योजना
उद्देशशेती सिंचनासाठी पाणी आणि रोजगार निर्मिती
लाभार्थीग्रामीण भागातील लहान आणि सीमांत शेतकरी
अनुदान₹4 लाख पर्यंत (विहिरीच्या आकारावर अवलंबून)
अर्ज पद्धत ऑनलाईन (App द्वारे)
App चे नाव इजीएस हॉर्टी एप्लीकेशन

Vihir Yojana Online Form

परंतु तुम्ही मनरेगा योजनेअंतर्गत अर्ज सादर केला तर तुम्हाला या योजनेअंतर्गत चार लाख रुपये पर्यंत अनुदान विहिरीसाठी मिळत असतो.

आता हे अर्ज तुम्हाला कुठेही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार नाही, हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या मोबाईलवर करता येतात. यासाठी शासनाकडून नवीन मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेला आहे.

तरी या नवीन मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून नवीन सिंचन विहिरींसाठी ऑनलाईन किंवा मोबाईलच्या एप्लीकेशन माध्यमातून अर्ज कसा करायचा आहे ? हे आपण थोडक्यात जाणून घेऊया.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत नवीन सिंचन विहिरींसाठी अनुदान उपलब्ध करून शासनाकडून दिले जात आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना

आज या लेखातून आपण विहिरीकरिता आणि त्या मिळणाऱ्या अनुदानासाठी अर्ज कसा करावा लागतो ? कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतात याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सर्वप्रथम जाणून घेऊया की महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज कसा करायचा आहे ? सुरुवातीला विहीर अनुदान योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करावा लागत होता,

त्या सर्व बाबींसाठी नवीन अपडेट आता या ठिकाणी करण्यात आले आहे. आता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे.

ऑनलाईन पद्धतीने अर्थातच नवीन ॲप्लिकेशन शासनाकडून जाहीर करण्यात आले, त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येतो.

📢 हे पण वाचा :- आता घरबसल्या मोबाईलवर चेक करा तुमच्या आधार कार्ड कोणते बँक खाते लिंक आहेत ? वाचा प्रोसेस पटकन !

नवीन सिंचन विहीर ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?

हे याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. विहीर अनुदान योजनेसाठी एप्लीकेशन वरून शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत असे देखील आवाहन शासनाकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.

त्याचबरोबर फळबाग लागवडीसाठी आणि विहीर अनुदानासाठी एप्लीकेशन वरून ऑनलाईन अर्ज करता येतो. तुम्हाला माहितीच आहे की फळबाग लागवडसाठी देखील 100% अनुदान मिळत, आणि विहिरीसाठी देखील

100% अनुदान महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत दिलं जातं. आता एप्लीकेशन मध्ये यासाठी स्वतंत्र व्यवस्था देखील उपलब्ध आहे,

Vihir Yojana Online Form
Vihir Yojana Online Form

एप्लीकेशन ओपन केल्यानंतर विहिरीसाठी किंवा फळबागेसाठी अर्ज कॉलम मध्ये इच्छुक शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज करता येतो. अर्ज करण्याची खूपच सोपी पद्धत या ठिकाणी आहे.

आता या ॲप्लिकेशन कसं इन्स्टॉल करायचं आहे ? आणि या संदर्भात अधिक माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

📢 हे पण वाचा :- FD आता घरबसल्या मोबाईलवर चेक करा तुमच्या बँकेला कोणता नंबर लिंक ? वाचा प्रोसेस पटकन !

सिंचन विहीर ऑनलाईन अर्ज कोणकोणती कागदपत्रे ?

ही इजीएस हॉर्टी एप्लीकेशन वर विहीर किंवा फळबाग योजनेसाठी अर्ज करत असताना शेतकऱ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मिळणारे रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड
  • 8अ उतारा
  • विहीर बांधकाम त्याठिकाणचा सातबारा उतारा
  • मोबाईल क्रमांक
  • बँक खाते पासबुक

इतर महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी सादर करावे लागतात.

Vihir Yojana Online Form

📢 इजीएस हॉर्टी एप्लीकेशन येथे क्लिक करा

आता सर्वप्रथम इजीएस हॉर्टी एप्लीकेशन वर ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो ? याची माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे समजून घ्यायचे असेल तर खाली देण्यात

आलेला व्हिडिओ प्ले बटन वरती क्लिक करून तो व्हिडिओ पाहून घ्या. आणि त्यानंतर सोप्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *